Wednesday, January 21, 2009

सुभाषित संग्रह

People who knows sanskrit must be knowing about subhashitam...
शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकले होते. तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत.
म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज भासली.
पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत...

१) पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्‌
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थ - या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकडयांना "रत्न" असे म्हणतात.

२) रामाभिषेके जलमाहरन्त्या । हस्ताच्युतो हेमघटो युवत्या: ॥
सोपाणमार्गेण करोति शब्दं। ठंठंठठंठंठठठंठंठठ: ॥
अर्थ - रामाच्या अभिषेकाकरीता पाणी आणत असताना युवतीच्या हातून सोन्याची घागर (हेमघट) पडली.
आणि ती पाय -यांवरून घरंगळत जाताना आवाज झाला
ठंठंठठंठंठठठंठंठठ: ..
हे सुभाषित चरणपुर्ती किंवा काव्यपुर्ती या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये फ़क्त चौथा चरण देवून आधीचे ३ चरण रचायचे असतात.

3)
वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत:।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौह्र्दम ॥
अर्थ - जंगलामध्ये वणवा लागला असताना वारा अग्नीला मदत करतो. मात्र तोच वारा दिव्याची ज्योत (दुर्बल अग्नी) विझवतो. दुर्बलाला कोण मित्र असतो?? (कोणीही नसतो)

४) कमले कमला शेते । हर: शेते हिमालये ।
हरि: शेते समुद्रे च । मन्ये मत्कुणशन्कया ॥

अर्थ - लक्ष्मी कमळामध्ये झोपते. शंकर हिमालयामध्ये झोपतो. विष्णू समुद्रामध्ये झोपतो. बहुतेक ढेकणांच्या भीतीने... :)

5) उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥
अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).

६)
किं वाससा तत्र विचारणीयाः वसः प्रधानं खलु योग्यतायाम्॥
पीतांबरम वीक्ष्य दधौ स्वकन्यां चर्माम्बरं वीक्ष्य विंषं समुद्रः॥
अर्थ - कपड्यांवर काय अवलंबून असते? तर बरंच काही असते. पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली मुलगी दिली आणि चामडं गुंडाळणा-या शंकराला विष दिले.

७) कस्तुरि जायते कस्मात्‌ को हन्ति करिणां शतम्‌।
भीरु: करोति किं युध्दे मृगात सिंह: पलायते ॥

अर्थ- कस्तुरी कोणापासून मिळते? शंभर हत्तींची हत्या कोण करतो? भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो?
हरणापासून सिंह पळतो.
स्पष्टीकरण - शेवटचे चरण थोडेसे संभ्रमात टाकणारे आहे. "सिंह हरणापासून पळतो". actually, यात पहिल्या ३ चरणांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि चौथ्या चरणात त्याची उत्तरे आहेत.
कस्तुरी कोणापासून मिळते? - हरणापासून
शंभर हत्तींची हत्या कोण करतो? - सिंह
भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? - पळतो



3 Comments:

At 4:03 PM , Blogger Pramod said...

' dadhi madhuram madhu madhuram draksha madhura sudhapi madhuraiv'

Pudhachi line exactly aatahvat nahi.. tula kadachit mahiti asel..
:)

-Pramod

 
At 6:32 AM , Blogger BlackBox said...

Great collection. Thanks.

 
At 1:14 AM , Anonymous Anonymous said...

tasya tadev hi madhuram yasya mano yatra salagnam

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home