Wednesday, April 04, 2007

अविस्मरणीय वासोटा!!

नुकताच आम्ही officeमधल्या लोकांनी सातार्‍यापासून अवघ्या 35Km वर असणार्‍या वासोटा डोंगराचा trek केला. वासोट्याचा trek म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यांत जास्त आनंददायी event.. जसा एखाद्या टुकार cricket match मध्ये टुकुटुकु खेळणार्‍या batsmanचा चुकून six बसावा अगदी तसा.. तो एक क्षण, तो आनंद.. तो जल्लोष.. त्याच्यापुढे मग सगळं काही फिकं पडतं.. सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं.. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते.. उमेदीची.. उत्साहाची.. मस्त!! एकदम भारी!!...
शनिवारी सकाळी पुणे सोडताना पुढे काय होणार याची अजिबात कल्पना नव्हती. बसमध्ये ओरडून-आरडून सगळी रापचिक आणि छपरी गाणी म्हणताना मिळणारा आनंद, महागड्या multiplex मध्ये ACत बसून superduper hit सिनेमा बघताना मिळणार्‍या आनंदापेक्षा कितीतरी पटीने अधिक होता.. राजवाडा चौकात बसून खाल्लेली पूरी-भाजी ही मोठ्याशा हॉटेलात मिळणार्र्या पंचपक्वानांपेक्षाही रुचकर लागत होती.. सुख म्हणजे दुसरं काय? हे असेच बेधुंद क्षण.. कितीही पैसे मोजले तरी विकत न घेता येवू शकणारे..एकदम भारी!! जाम आवडलं मला..
बामणोलीसारख्या छोट्याशा गावात उतरल्या उतरल्या समोर दिसलं कोयनेच्या धरणाचं पाणी(back water) आणि सभोवताली लाल माती आणि हिरवेगार डोंगर.. अगदी त्या गावातील अडाणी आणि खेडवळ समजल्या जाणार्‍या लोकांच्या नशिबाचं हेवा वाटायला लावणारं असं हे दृष्य!! "मिट्टी की जो है खूशबू" या ओळी ओठांवर आणणारी माती..
सामानाची गाठोडी बोटीत टाकून मग वासोट्याकडे जाणारा रोमांचक आणि थरारक प्रवास सुरू झाला. प्रत्येक क्षणाला बोटीने पाण्यात कापलेले अंतर ., आणि काहीतरी "एकदम भारी घडतंय याची श्हारक जाणीव!! मनात हूरहूर, भीती, आश्चर्य आणि आनंद या सगळ्यांचा संमिश्र उमाळा... मस्त!!
कितीतरी क्षण जपून ठेवण्याजोगे.. बोटीत खाल्लेल्ला खाकरा, कल्पेश्च्या non-stop शिट्ट्य़ा, आरती आणि निलेशचा fullto माssज.., आणि जाSSम दंगा!!! "डोक्यात जाऊ नकोस(in kalpesh's eshtyle)" हा आमचा दंगा करण्यासाठीचा main dialogue.. आजूबाजूला डोळ्यांचं पारणं फ़िटेपर्यंत दिसणारं मोहक निसर्गसौंदर्य! आणि त्या अचाट निसर्गाला दोन-इंची कॅमेर्‍यात बंदिस्त करण्यासाठीची आमची निष्फ़ळ धड्पड.. बोटीने पाणी कापताना होणारा घुंगराळ आवाज, उडणारे पक्षी, दिवसा झाडांना उलटी टांगून विसावलेली वट्वाघळं, म्हशींना रानगवा म्हणण्याचं आमचं अचाट धाडस, पाण्यात खाकरा टाकून मासे शोधण्याचा आमचा डाव.. सगळं कसं झक्काSSस आणि एकदम भारी!!..
दीड तासांचा पाण्यावरचा प्रवास संपवून आमची बोट एकदाची वासोट्याच्या किनार्‍याला लागली.. त्या किनार्‍यावर उतरताना मनात थोडीशी भीती मात्र वाटली आणि आपल्या धाडसाचं कौतुकही!! हसत खेळत, रणरणत्या उनात, इतिहास घडवायला आमचं 21 जणांचं टोळकं पाठीवर बॅगा अडकवून सुसज्ज तयार झालं!! प्रत्येक पावलागणिक मनातला उत्साह वाढत होता..
थोडसं पुढं गेल्यावर forest office लागलं आणि पुढचा plan तिथच ठरला.. आधी नागेश्वर डोंगर चढायचा आणि तिथे मुक्काम करून नंतर वासोटा गाठायचा.. ठरलं तर मग!! जाताना एक guide मिळाला.. हाच तो खराखुरा "आनंद".. वयानं आमच्या सर्वांपेक्षा खूपच लहान पण धाडस आणि काटकपणामध्ये आम्हा सर्वांच्यापुढे चार इयत्ता पुढं ओलांडलेला.. देवाचं नाव घेवून finally आम्ही नागेश्वराकडे कूच केलं. कोरड पडलेल्या ओढ्यातून जाणारा रस्ता, गुळगुळीत झालेल्य दगडधोंड्यांचा रस्ता, रंगीबेरंगी फ़ुलपाखरांनी वेढलेला रस्ता.. सगळं कसं हवंहवंसं.. शिकेकाईच्या झाडाला लाल रंगांची सुंदर फुले असतात अशी नवीन भरही पडली आमच्या ज्ञानामध्ये.. प्रत्येक पावलागणिक काहीतरी नवीन दिसत होतं, कुतुहलमिश्रित आनंद वाढत होता.. मध्ये एक pause घेवून टरबूजाचा फडशा पाडण्यात आला.. सगळे कसे अगदी त्यावर तुटून पडले.. वैभव तर वर्षानुवर्षे ज्युसबारवर काम करत असल्यासारखा फ़ोडी कापून देण्यात मग्न झाला होता. नंतरचा halt भोजनासाठी (नव्हे वनभोजनासाठी) झाला.. officeमधल्या canteen मध्ये खुर्ची-टेबलावर जेवण्यासाठी ताटकळणार्‍या sophisticated software engineers ना निसर्गानं जमिनीवरच्या लाल मातीवर पेपर टाकून जेवण्यास भाग पाडलं. पण तरीही निसर्गाला शरण जाण्यात जी मजा आली ती ACत बसून computer वरची बटणं खटाखटा दाबण्यात नसते हेही कळून चुकलं.. नंतर आमच्या "आनंदा"नं पुढचा अर्धा तास (आणि त्यानंतर कितीतरी अर्धा तास) चालवत नेलं आणि उंच उंच चढताना आता ह्रदय फडफ़ड्त बाहेर पडतंय की काय असं वाटायला लागलं.. अशाच एका अर्ध्या तासाच्या अंतरावर एका छोट्या पठारावर दमछाक होऊन सगळे 180 degrreत आडवे झाले. आता खराखुरा वाघ आला असता तरी "खा रे बाबा पण नाही उठू शकत" असे म्हणण्याची वेळ आली होती. उनाड डोंगरावर पहुडलेले आम्ही 21 जण.. मस्त!! एकदम भारी!!
त्यानंतर दिसली इतक्या उंचीवर विसावलेली विहीर.. थंडगार पाणी.. स्वच्छ आणि निर्मळ पाणी.. कितीतरी निसर्गप्रेमी ट्रेकर्सना संजीवनी ठरलेलं पाणी.. तिथून अगदी 5च मिनिटांच्या उंचीवर नागेश्वर डोंगराचं पठार लागलं.. निसर्गानं आपल्या सौंदर्यानं उधळण केलेलं.. एका बाजुला बांबुकडा आणि त्यामागुन डोकावणारा वासोटा, समोरच्या बाजुला अफाट दरी, आणि उजव्या बाजूला नागेश्वर डोंगराचा बुरूज.. जणु त्या डोंगराचं डोकंच..डोळ्यांच्या जागी गुहांची खोबणं.. आणि माथ्यावर फड्फड्णारा भगवा.. मस्त आणि एकदम भारी!!
रात्री पेटवलेली शेकोटी, चुलीवर बनवलेला चहा आणि खिचडी-भात, पापड, शेकोटीभोवती गायलेली गाणी, तिथे केलेला दंगा... एक अस्सल सुखकारक असा अनुभव.. वेगवेगळया प्रकारच्या, वेगवेगळया संसकृतीत वाढलेल्या 21 लोकांना निसर्गानं समान पातळीवर आणून ठेवलं होतं.. माणूस फक्त माणूस असतो याची जाणीव करून देणारा तो क्षण..
दुसर्‍या दिवशी सकाळी ढग जमिनीवर अवतरल्याचं दृश्य पाहून स्वर्गसौंदर्य काय असेल याची कल्पना आली.. पांढर्‍याशुभ्र ढगांच्यामधून डोकावणारे डोंगरांची शिखरे.. तिथल्या पठारावर उभं राहून ते निसर्गसौंदर्य डोळ्यांनी घटाघटा पिताना अगदी कृतार्थ झाल्यासारखं वाटलं..
नाश्तापाणी उरकून आम्ही वासोट्याकडे प्रयाण केलं..वाट खड्तर होती.. एका बाजूला जंगलाने व्यापलेला उंच डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी.. विरोधाभासाचं यापेक्षा चांगलं उदहरण कुठे सापडणार? आयुष्यही असंच नाही का? त्या दोघांच्या मधल्या कड्यावरून जाणारी चिंचोळी वाट ध्येयाकडे नेत हॊती..आवश्यक होता फ़क्त स्वत:चा balance..एक चुकीचं पाऊल आणि खेळ खल्लास!! डोंगराची बाजू आव्हान पेलण्याचं बळ देत होती आणि दरीची बाजू पावलं डगमगवण्याची शिकस्त करत होती.. जो दोन्ही बाजू handle करू शकत होता तोच पुढे जात होता यशाच्या वासोट्याकडे!!! Life is all about BALANCE!!
सलग 3 तास कडा मग जंगल आणि मग चढ पार करून आम्ही वासोटा गाठला.. पाण्याचं दुसरं रूप .. दोन कुंडांच्या रुपात.. घामाने निथळणार्‍या शरीरावर पाण्याचे फ़वारे मारताना मिळालेला आनंद! सुख सुख काय असतं याची आठवण करून देणारा क्षण.. तीन डोंगर एकामागे एक आपली शिखरं उंचावून उभी होती आणि त्यातलं सर्वांत दूरचं होतं नागेश्वर डोंगराचं.. त्या टोकापासून आपण येथवर आलो याचा अभिमान वाटत होता.. छाती अभिमानाने फुगून आली होती..जो तो स्वत:वर जाम खूष होता.. मान उंचावून आव्हान देणारा वासोटा आम्ही जिंकला होता.. म्हणावसं वाटत होतं "अनंत अमुची ध्येयासक्ती अन्म्त अन आशा, किनारा तुला पामराला!" मस्त मस्त आणि एकदम भारी!!!!!!!
परतीचा प्रवास पुन्हा जंगलातून सुरू झाला.. ललकारण्याला वासोट्याला नामोहरम करून आम्ही तो उतरायला सुरुवात केली.. "चलाSS चला चलाSS च्या आरोळ्या दुमदुमल्या.. पूर्ण वासोटा उतरल्यावर मग आमचा climax hero अवतरला.. काळा कोल्हा!! अगदी rampवर उतरल्यासारखा pose देऊन आमच्याकडून photosession करवून घेत होता.. आणि आमचे कॅमेरे click click करण्याची शर्यत करत होते..बहुतेक ऎश्वर्या पेक्षाही जास्त भाव त्याला मिळाला असावा!
परतीची बोट आमची वाट पाहत उभी होती.पुन्हा खळाळ खळाळ आवाज करत बोटीने पाणी कापायला सुरुवात केली. वासोटा दूर दूर जात होता आणि एक विरहतेची व्याकूळ भावना उचंबळून येत होती.. आता हे सगळं नजरेआड होणार होतं.. डोळे ते अमृत शेवटचं का होईना पण पिण्यासाठी धडपडत होते.. आम्ही सगळेच मनाने प्रौढ झालो होतो, आयुष्यात एक stepपुढे गेलो होतो.. आठवत होता, बोटीत बसून गुणगुणणारा स्वदेसमधला शाहरुख.."ये जो देस है तेर, स्वदेस है तेरा"..
हा अनुभव कायम आमच्या गाठीशी राहणार होता. ही आठवण मनात घर करुन राहणार होती.. मरेपर्यंत किंवा त्यानंतरही.....

16 Comments:

At 11:21 PM , Blogger mandy said...

mag kay aamcha satara aahecha muli chhan.............

 
At 12:25 PM , Anonymous Anonymous said...

Hey.. i would like to appreciate u'r so well description of the event.. tht i feel as if i have visited the place.. :))

 
At 3:56 AM , Blogger chega said...

Too good!! Tujhya shabdat mhanaycha tar "ekdam bhaari!!" Asa watate he waachun wasotyala gelo asto tar a better experience milala asta pratyek gosht eka weglya najrene baghitli asti.

 
At 2:30 AM , Blogger Subhash Dike said...

मस्त आणि एकदम भारी!!
:-)

 
At 1:16 AM , Blogger ROHAN said...

h!! Suvarna
masta aahe
Unforgettable!![अविस्मरणीय वासोटा]

 
At 12:37 AM , Blogger deepanjali said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे.
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

 
At 4:12 AM , Blogger Sagar said...

:) ahem..
nicely written..
i could reminisced my trek 2 wasota..
kip it up...

 
At 1:16 AM , Blogger Shashi said...

Hi miss Mane,
Excellent "Pravas Varnan " , u have made it all alive, Keep it up.
~ShashiKant

 
At 12:54 AM , Blogger ni3 said...

Hi Suvarna..!!!
Excellent "Pravas Varnan".
Now u can add one more thing on your profile...as a Writer...!
:)
The description of your Trip is too good.

 
At 7:52 AM , Blogger Pramod said...

Hey Suvarna,
I am Pramod. We are linked through Meghanand- common friend. I had heard from megh about his Vasota trip with the whole sasken gang.. but never had imagined that it was such a wonderful experience.Aaj rikama vel net varti TP karnyat vaya jail ase vatale hote..but this marathi blog made my day...I couldnt leave this blog without appreciating your narration and ability to pick up the minute details... jaam bhari !!
hats off to you yaar .. baryach kalane changle marathi vachlayacha anand zala...
I must admit that you have given me complex :) and have indirectly encouraged to read more marathi stuff..
Keep writing..
Pramod

 
At 12:14 AM , Blogger suvarnam said...

I want to thank all the ppl who liked my first attempt of writing.. I am not a writer and this blog is a result of the excitement i had at vasota trek.. :) even after 2 years I can still feel the same excitement about it..
@pramod.. thanks alot for ur appreciation. It feels nice to know that my lil attempt at writing made somebody's time worth of reading it..

 
At 3:24 AM , Blogger Rahul Verma said...

This comment has been removed by a blog administrator.

 
At 10:47 PM , Blogger दिनेश. said...

This comment has been removed by the author.

 
At 10:50 PM , Blogger दिनेश. said...

फारच छान. एक उत्तम प्रवास वर्णन. मला लगेच प्रवासाला निघावस वाटतय !!!

दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

 
At 2:05 AM , Blogger Binary Bandya said...

फार छान लिहिले आहे...

 
At 6:43 AM , Anonymous Anonymous said...

This comment has been removed by a blog administrator.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home