Saturday, January 17, 2009

कणा (kana)

This is the one poem which I learned in school and I can never forget it.. One of my most favorites..
Title is Kana (exact translation is "Backbone")

ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहूणी आली, गेली घरट्यात राहून,

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणुनी पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेवुन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चि्खलगाळ उपसतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवूनी नुसतं लढ म्हणा...

-- कुसुमाग्रज

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home