Wednesday, January 21, 2009

सुभाषित संग्रह

People who knows sanskrit must be knowing about subhashitam...
शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकले होते. तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत.
म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज भासली.
पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत...

१) पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्‌
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥

अर्थ - या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक मात्र दगडाच्या तुकडयांना "रत्न" असे म्हणतात.

२) रामाभिषेके जलमाहरन्त्या । हस्ताच्युतो हेमघटो युवत्या: ॥
सोपाणमार्गेण करोति शब्दं। ठंठंठठंठंठठठंठंठठ: ॥
अर्थ - रामाच्या अभिषेकाकरीता पाणी आणत असताना युवतीच्या हातून सोन्याची घागर (हेमघट) पडली.
आणि ती पाय -यांवरून घरंगळत जाताना आवाज झाला
ठंठंठठंठंठठठंठंठठ: ..
हे सुभाषित चरणपुर्ती किंवा काव्यपुर्ती या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये फ़क्त चौथा चरण देवून आधीचे ३ चरण रचायचे असतात.

3)
वनानि दहतो वह्ने: सखा भवति मारुत:।
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौह्र्दम ॥
अर्थ - जंगलामध्ये वणवा लागला असताना वारा अग्नीला मदत करतो. मात्र तोच वारा दिव्याची ज्योत (दुर्बल अग्नी) विझवतो. दुर्बलाला कोण मित्र असतो?? (कोणीही नसतो)

४) कमले कमला शेते । हर: शेते हिमालये ।
हरि: शेते समुद्रे च । मन्ये मत्कुणशन्कया ॥

अर्थ - लक्ष्मी कमळामध्ये झोपते. शंकर हिमालयामध्ये झोपतो. विष्णू समुद्रामध्ये झोपतो. बहुतेक ढेकणांच्या भीतीने... :)

5) उद्यमेन हि सिद्धन्ति कार्याणि न मनोरथै: ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यन्ति मुखे मृग: ॥
अर्थ - प्रयत्न केल्यानेच कार्ये पूर्ण होतात. केवळ स्वप्ने बघून (मनोरथे करुन) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करत नाही. (त्यासाठी त्याला शिकार करावीच लागते).

६)
किं वाससा तत्र विचारणीयाः वसः प्रधानं खलु योग्यतायाम्॥
पीतांबरम वीक्ष्य दधौ स्वकन्यां चर्माम्बरं वीक्ष्य विंषं समुद्रः॥
अर्थ - कपड्यांवर काय अवलंबून असते? तर बरंच काही असते. पीतांबर नेसलेल्या विष्णूला समुद्राने आपली मुलगी दिली आणि चामडं गुंडाळणा-या शंकराला विष दिले.

७) कस्तुरि जायते कस्मात्‌ को हन्ति करिणां शतम्‌।
भीरु: करोति किं युध्दे मृगात सिंह: पलायते ॥

अर्थ- कस्तुरी कोणापासून मिळते? शंभर हत्तींची हत्या कोण करतो? भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो?
हरणापासून सिंह पळतो.
स्पष्टीकरण - शेवटचे चरण थोडेसे संभ्रमात टाकणारे आहे. "सिंह हरणापासून पळतो". actually, यात पहिल्या ३ चरणांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि चौथ्या चरणात त्याची उत्तरे आहेत.
कस्तुरी कोणापासून मिळते? - हरणापासून
शंभर हत्तींची हत्या कोण करतो? - सिंह
भित्रा मनुष्य युध्दामध्ये काय करतो? - पळतो



Saturday, January 17, 2009

कणा (kana)

This is the one poem which I learned in school and I can never forget it.. One of my most favorites..
Title is Kana (exact translation is "Backbone")

ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून,
गंगामाई पाहूणी आली, गेली घरट्यात राहून,

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली,
भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले,
प्रसाद म्हणुनी पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले,
कारभारणीला घेवुन संगे सर आता लढतो आहे,
पडकी भिंत बांधतो आहे, चि्खलगाळ उपसतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवूनी नुसतं लढ म्हणा...

-- कुसुमाग्रज

Ek kharakhura Nastik...

hmm... so i m back after many many days... I dont know how good writer i am.. but i have vibrant mood swings which make me to come here and post.. :)
Its sunday today and i am bored! I seriously dont know what to do.. i have this 2007 diary of mine in my hands.. i remember i had bought it as new-year resolution .. Funn part is, it is almost empty except for few pages.. but i found something on one of the pages which drew my attention.. it is a poem by Sandeep khare.. i remember i had just started to listen to his songs that time and had liked some of them.. this poem has a different flavor and is one of my favorites.. so i am sharing it here.. hope u like it.. :)
its in marathi and many maharastrians may know it.. the title is Nastik.. i.e. atheist

DISCLAIMER: I am not supporting Atheism neither Theism.. this poem has some innovative way to look at this issue which attracted my attention and that is the reason I shared it.

एक खराखुरा नास्तिक जेव्हा
देवळा बाहेर उभा थांबतो ,
तेव्हा खरा तर गाभा
ऱ्यातच भर पडत असते
की कोणीतरी आपापल्यापुरत्या सत्याशी का होइना पण प्रामाणिकपणे चिकटून रहिल्याच्या पुण्याईची !

एक
खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर उभा थांबतो
तेव्हा शक्यता होते देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची ..

एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर उभा थांबतो
तेव्हा कोऱ्या नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली
भाविकांच्या जात्रा ..
कोणीतरी स्वत:चे ओझे स्वत:च्याच पायावर संभाळत असल्याचे समाधान लाभते देवाला !!

म्हणुन तर जेव्हा
एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळा बाहेर उभा थांबतो ..
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे ..

देउळ बंद झाल्यावर, एक मस्त
आळस
देवून,
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो
"दर्शन देत जा अधून मधून
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर, पण आमचा तर आहे ना ! "

देवळा बाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला
मोठ्या मिनतवारीने परत पाठवतो देवळात, तेव्हा कुठे अनंत वर्षी
आपण घेवू शकतो दर्शन आस्तिकत्त्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे ...
एक खराखुरा नास्तिक जेव्हा ...

-- संदीप खरे